S M L

हिरानंदानी हॉस्पिटलच्या अवयव प्रत्यारोपणाचा परवाना तात्पुरता रद्द

Sachin Salve | Updated On: Aug 10, 2016 04:38 PM IST

हिरानंदानी हॉस्पिटलच्या अवयव प्रत्यारोपणाचा परवाना तात्पुरता रद्द

मुंबई, 10 ऑगस्ट : किडनी रॅकेटप्रकरणी हिरानंदानी हॉस्पिटलवर कारवाई करण्यात आली आहे. या हॉस्पिटलचा अवयव प्रत्यारोपणाचा परवाना तात्पुरता रद्द करण्यात आला आहे. कोर्टाच्या निर्णयापर्यंत हा परवाना स्थगित राहणार आहे. जर या प्रकरणात दोषी आढळल्यास परवाना कायमचा रद्द करण्यात येईल अशी माहिती आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिली.

पवईच्या हिरानंदानी रुग्णालयातील किडनी रॅकेटप्रकरणी रुग्णालयाच्या पाच डॉक्टरांना रात्री उशिरा मुंबई पोलिसांनी अटक केली. त्यामध्ये हिरानंदानी रुग्णालयाचे सीईओ डॉ. सुजीत चॅटर्जी, वैद्यकीय संचालक डॉ. अनुराग नाईक, डॉ. मुकेश शेटे, डॉ. प्रकाश शेट्टी, डॉ.मुकेश शहा यांचा समावेश आहे. मुंबईमधील किडनी रॅकेट प्रकरणी करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. तसंच अलिकडच्या काळातलं मुंबईतलं हे सर्वात मोठं हायप्रोफाईल हॉस्पिटलमधलं किडनी रॅकेटही आहे. सुरुवातीला हॉस्पिटलमधल्या कर्मचार्‍यांना अटक झाली होती पण आता शेवटी पोलीसांनी हॉस्पिटलच्या सीईओलाच अटक केल्यानं हॉस्पिटलच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्हं निर्माण झालंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 10, 2016 04:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close