S M L

नांदेड पालिकेच्या भरसभागृहात MIM च्या नगरसेवकांचा आत्मदहनाचा प्रयत्न

Sachin Salve | Updated On: Aug 10, 2016 05:48 PM IST

नांदेड पालिकेच्या भरसभागृहात MIM च्या नगरसेवकांचा आत्मदहनाचा प्रयत्न

10 ऑगस्ट : नांदेड मनपाच्या महासभेत आज चांगलाच गोंधळ झाला. विकासकामं होत नसल्याच्या आरोपावरुन एमआयएमच्या तीन नगरसेवकांनी भर सभागृहात अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. प्रभागांमध्ये विकासकामं होत नसल्याचा या नगरसेवकांचा आरोप आहे. प्रभागातली रखडलेली कामं तातडीनं व्हावी यासाठी पाठपुरावा करुनही कामं होत नसल्यानं नगरसेवकांनी महापौरांना जाब विचारला.

ब्रह्मपुरी प्राभागातील रखड्लेली विकास कामे त्वरित सुरू करावी यासाठी अनेक दिवसांपासून एमआयएमचा पाठपुरावा सुरू आहे. पण या मागणीकडे सत्ताधारी आणी अधिकारी लक्ष देत नाहीत. पालिकेच्या सभेत याच कामांच्या प्रश्नावरुन एमआयएमच्या नगरसेवकांनी महापौरांना जाब विचारला. पण महापौरांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने एमआयएमचे नगरसेवक हबीब बागवान संतप्त झाले.

आपल्या जवळील बॉटल मधील रॉकेल ओतून त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. हबीब बागवान यांच्या पत्नी नगरसेविका आसिया बेगम आणि एम एमएमच्या नगरसेविका बिपाशा बेगम यांनीही रॉकेल ओतून घेतले. एमआयएमच्या इतर नगरसेवकांनी त्यांना रोखले. दरम्यान, या घटनेनंतर सभागुह काही वेळ तहकूब करण्यात आले होते. एमआयएमच्या वार्डात हेतुपुरस्सर सत्ताधारी काँग्रेस विकासकामे होऊ देत नसल्याचा आरोप या नगरसेवकांनी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 10, 2016 05:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close