S M L

बदलापूरचा गड युतीकडे

12 एप्रिलबदलापूर नगर पालिकेचा गड भाजप-शिवसेनेने आपल्याकडे राखण्यात यश मिळवले आहे. मतमोजणीच्या सर्व तिन्हीही फेर्‍यांअखेर सेना-भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले. या ठिकाणी भाजप सेनेत निवडणूकपूर्व युती नव्हती. एकूण 34 जागांपैकी भाजप-शिवसेनेला 19 जागा मिळाल्या आहेत. यात सेनेला 12 जागा तर भाजपने 7 जागा मिळवल्या आहेत.राष्ट्रवादीने 10 जागा पटकावल्या आहेत. काँग्रेसला केवळ 1 तर मनसेला 3 जागांवर समाधान मानावे लागले आहे. अपक्षांना केवळ एकच जागा मिळू शकली. गेल्या वेळी भाजप-सेनेला 25 जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यांचे तब्बल 6 जागांचे नुकसान झाले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 12, 2010 09:43 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 12, 2010 09:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close