S M L

#रिओअपडेट्स : दीपिकाने साधला अचूक निशाणा

Samruddha Bhambure | Updated On: Aug 11, 2016 03:07 PM IST

#रिओअपडेट्स : दीपिकाने साधला अचूक निशाणा

 

11 ऑगस्ट :    रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय तिरंदाज दीपिका कुमारीने अचूक लक्ष्यवेध करत अतिंम सोळामध्ये स्थान मिळविलं आहे. 'राउंड ऑफ 32'मधील सामन्यात दीपिकाने इटलीच्या गुएनदालिना सार्तोरीचा 6-2 असा पराभव केला आणि अंतिम 16मध्ये स्थान मिळवलं. तिरंदाजीच्या अंतिम 16मध्ये प्रवेश करणारी दीपिका तिसरी भारतीय आहे. याआधी महिलांमध्ये बॉम्बायला देवी आणि पुरुषांमध्ये अतनु दास यांनी अंतिम 16मध्ये प्रवेश केला आहे.

अंतिम 16मध्ये दीपिकाचा सामना जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानावर असलेल्या चिनी ताइपेइच्या तान या टिंग हिच्याशी होणार आहे.

2010 साली राष्ट्रकूल स्पर्धेतही तिने वैयक्तिक आणि सांघिक प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली होती. तर आशियाई क्रीडा स्पर्धेत तिला कांस्य पदक मिळालं होतं. तिच्याकडून भारताला पदकाची आशा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 11, 2016 10:02 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close