S M L

गोसंवर्धनाच्या नावाखाली गायींची 'छळ छावणी'

Sachin Salve | Updated On: Aug 11, 2016 09:20 PM IST

गोसंवर्धनाच्या नावाखाली गायींची 'छळ छावणी'

नागपूर, 11 ऑगस्ट : गोसेवेच्या नावावर नागपूर जिल्ह्यातील कुहीतल्या सिल्ली येथे तथाकथित गोररक्षण केंद्रात गायींवर अन्याय होत असल्याची धक्कादायक बाबसमोर आलीये. गोसंवर्धक गो हत्या निवारक प्रचार समिती कुही असे या तथाकथीत गोरक्षण केंद्राचे नाव असून गेल्या तीन महिन्यात या केंद्रात तीस गाईंचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

दरम्यान, या केंद्रातील आजारी आणि अन्नाविणा मृत्यू पावलेल्या गाईंना केंद्राच्याच मागे असणार्‍या तलावात फेकून देण्यात येत असल्याचंही पुढे आलं आहे. या ठिकाणच्या शेकडो गायींना चारा आणि पाणी सुद्धा मुबलक मिळत नाही. या ठिकाणची जागा हडपण्यासाठी हे तथाकथित गोररक्षणच्या नावावर चालवले जात असल्याचा आरोप होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 11, 2016 09:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close