S M L

#रिओअपडेट्स : सानिया-रोहन जोडी उपांत्यपूर्व फेरीत

Samruddha Bhambure | Updated On: Aug 12, 2016 09:56 AM IST

#रिओअपडेट्स : सानिया-रोहन जोडी उपांत्यपूर्व फेरीत

12 ऑगस्ट :  भारताच्या सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा या जोडीने रिओ ऑलिम्पिकमध्ये मिश्र दुहेरीतील पहिल्या सामन्यात विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सानिया- रोहन जोडीने ऑस्ट्रेलियाच्या समंथा स्टोसूर आणि जॉन पियर्स यांचा 7-5, 6-4 असा पराभव केला.

हा सामना बुधवारी होणार होता. मात्र मुसळधार पावसामुळे शुक्रवारी खेळवण्यात आला. सानिया- रोहन यांनी सामन्याच्या सुरुवातीपासूनच दबदबा ठेवला.

ऑलिम्पिकमध्ये चौथे मानांकन मिळालेल्या भारताच्या जोडीने पहिल्या सेटमध्ये 5-4 अशी आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतरचा गेम गमवल्यामुळे 5-5 अशी बरोबरी झाली. अखेर सानिया-बोपण्णाने पहिला सेट 7-5 असा जिंकला. दुसर्‍या सेटमध्ये भारतीय जोडीने शानदार खेळ करत ऑस्ट्रेलियाच्या जोडीचा सहज पराभव केला.

उपांत्यपूर्व फेरीत सानिया - रोहनची लढत इंग्लंडच्या अँडीमरे आणि हेदर वॉटसन या जोडीशी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 12, 2016 09:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close