S M L

कोहलीने अशा शैलीत केले भारतीय ऍथलिट खेळाडूंना कुर्निसात !

Samruddha Bhambure | Updated On: Aug 20, 2016 07:04 PM IST

कोहलीने अशा शैलीत केले भारतीय ऍथलिट खेळाडूंना कुर्निसात !

‘ज्या देशाच्या नसनसांत रक्तापेक्षा अधिक क्रिकेट खेळत असते, तिथे ऐकिवात नसलेल्या, न चर्चिल्या गेलेल्या अशा काही महत्त्वाकांक्षा शांतपणे धावत असतात... अज्ञात, ऐकिवात नसलेल्या; मात्र कुणापेक्षा तसूभरही कमी नाहीत अशा !’

या छान ओळी आहेत ‘मेड ऑफ बोल्ड’ व्हिडियोमधल्या, ज्यात विराट कोहली खेळांच्या कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या ऍथलिटांच्या महत्त्वाकांक्षेला कुर्निसात करताना दिसतो. क्रिकेटची पूजा बांधणाऱ्या या देशात ऍथलिट खेळाडूंपुढे असंख्य आव्हाने असली तरी यश संपादन करण्याची आसक्ती त्यांच्याकडून मेहनत करून घेते आणि या ओळी धावपटूंच्या आपल्याला न दिसणाऱ्या मेहनतीलाच शब्दरूप देतात. या धावपटूंच्या वाट्याला प्रेक्षकांनी तुडुंब भरलेले स्टेडियम येत नाहीत, त्यांच्या मागे चाहत्यांची रीघ लागत नाही, तरीही हे खेळाडू प्रत्येक दिवशी आपले सर्वस्व पणाला लावून तयारी करतात, केवळ एका स्पर्धेपुरती नाही, तर पूर्ण चार वर्षे त्यांची ही तयारी सुरू असते. असे घडते कारण हे खेळाडू आहेत `मेड ऑफ गोल्ड’.

`रॉयल चॅलेंज स्पोर्ट्स ड्रिंक’ परिणामांची पर्वा न करता साहसी निर्णय घेण्याकरता व्यक्तींना प्रेरित करतात. `मेड ऑफ बोल्ड’ व्हिडियोद्वारे विराट कोहली आणि `रॉयल चॅलेंज स्पोर्ट्स ड्रिंक’ एकत्र आले आहेत आणि त्यांनी भारतीय ऍथलिट खेळाडूंच्या संघर्षमय प्रवासाला सलाम ठोकला आहे. हे खेळाडू कितीही आव्हाने वाटेत असली तरीही खेळाप्रति आपली ओढ कायम ठेवतात आणि म्हणूनच ते प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळण्यास अधिक पात्र आहेत.

विराट कोहली म्हणतात, `प्रत्येक यशस्वी ऍथलिट खेळाडूचा प्रवास हा त्यांच्या अंगभूत धाडसी गुणाचा, धैर्याचा आणि मनोनिश्चयाचा परिणाम असतो. मी लहानपणी क्रिकेटला आपलंसं केलं आणि त्यामुळे मला जनतेचं प्रेम आणि सन्मान मिळाला. देशात असे विजेते आहेत ज्यांनी क्रिकेट व्यतिरिक्त दुसरे खेळ निवडले, मात्र त्यांचा संकल्प आणि त्याग यांची कल्पना बहुसंख्य जनतेला नाही. ते शांतपणे, परिणामांची कल्पना न करता आपले सारे काही पणाला लावून प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात. ते खरंच `मेड ऑफ गोल्ड’ आहेत. हा व्हिडिओ ऍथलिटांच्या कधीही हार न मानणाऱ्या आत्म्याची झलक दाखवण्याचा प्रयत्न आहे.’

युनायटेड स्प्रिटचे विपणन विभागातील वरिष्ठ उपाध्यक्ष सुब्रोतो गीड यांनी सांगितलं की विराट एक सर्वश्रेष्ठ आणि जागतिक दर्जाचे ऍथलीट आहेत. मेड ऑफ बोल्ड या रॉयल चँलेंज स्पोर्टस् ड्रिंक्स या चित्रफीतीद्वारे विराट देशातील तमाम ऍथलिट खेळाडूंना सलाम करतो. हे असे खेळाडू आहेत जे आपल्या खेळाची निवड करताना अतुलनीय साहस दाखवतात आणि तमाम प्रतिकूल परिस्थितींचा सामना करावा लागला तरी स्वत:ला आणि खेळाला पुढे घेऊन जातात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 20, 2016 12:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close