S M L

दर्शिलचा 'बम बम बोले' येतोय...

12 एप्रिल 'तारे जमीं'परचा दर्शिल सफारी आता तुम्हाला भेटायला येतोय तो बम बम बोले सिनेमातून.. या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे, प्रियदर्शननं.. छोट्या बहिण भावाचं नातं दाखवणारा हा सिनेमा आहे.माजिद मजिदीच्या चिल्ड्रेन ऑफ हेवनचा रिमेक म्हणजे बम बम बोले.. दिग्दर्शक प्रियदर्शन टच लाभलेल्या या बम बम बोलेमध्ये दर्शिल सफारी आणि झिया वस्तानीनं छोट्यांची भूमिका साकारली आहे. दोघांनाही या सिनेमातून वेगळी भूमिका साकारायला मिळाली....माजिद मजिदीच्या चिल्ड्रेन ऑफ हेवनमधून बहीण-भावाचं सुंदर नातं रेखाटलंय.. या मुलाचा देवावरचा विश्वास आणि कुटुंबावरचं प्रेम छान दाखवलंय..प्रियदर्शनचा लहान मुलांबरोबरचा हा पहिलाच सिनेमा.. पण दिग्दर्शक आपल्या स्टारकास्टवर खूश आहे.. बम बम बोलेमध्ये अतुल कुलकर्णी आणि ऋतूपर्णा घोषही आहे. हा सिनेमा 7 मे रोजी रिलीज होत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 12, 2010 01:47 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 12, 2010 01:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close