S M L

लोकलमध्ये अपंगांना चढण्या उतरण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन द्या,कोर्टाचे रेल्वेला आदेश

Sachin Salve | Updated On: Aug 12, 2016 05:27 PM IST

लोकलमध्ये अपंगांना चढण्या उतरण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन द्या,कोर्टाचे रेल्वेला आदेश

मुंबई, 12 ऑगस्ट : मुंबईतील सर्व लोकल्सच्या स्टेशन्सवर अपंगांना लोकलमध्ये चढण्या उतरण्यासाठी योग्य त्या सोयीसुविधा उपलब्ध करुन द्या असे आदेश मुंबई हायकोर्टाने रेल्वे मंत्रालयला दिले आहेत. इंडिया सेंटर फॉर ह्युमन राईट अँड जस्टीस या संस्थेच्या वतीनं या संदर्भात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेच्या 11 स्टेशन्सवर तर पश्चिम रेल्वेच्या 6 स्टेशन्सवर अशी सुविधा करता येणार नाहीत असं रेल्वेनं सांगितल्यावर या सुविधा तुम्हाला द्याव्याच लागतील असं कोर्टानं रेल्वेला बजावलंय. विशेष म्हणजे पश्चिम रेल्वे चर्चगेट ते डहाणू असताना अपंगांना सुविधा देण्याबाबत रेल्वेनं चर्चगेट ते विरार याच मार्गाचा विचार केलाय. अशा सुविधा निर्माण करण्यासाठी काय करता येईल हे पाहण्यासाठी रेल्वेची स्वतःची ऑडिटची व्यवस्था आहे. त्यांच्याद्वारे ऑडिट करुन त्याचा अहवाल सादर करावा असा आदेश आता मुंबई हायकोर्टाने दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 12, 2016 05:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close