S M L

राज्यातील देवस्थानांची संपत्ती रुग्णसेवेसाठी द्या, महाजनांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Sachin Salve | Updated On: Aug 12, 2016 07:02 PM IST

राज्यातील देवस्थानांची संपत्ती रुग्णसेवेसाठी द्या, महाजनांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

12 ऑगस्ट : राज्यातील अनेक देवस्थानांकडे प्रचंड संपत्ती जमा आहे, त्यामुळे हा निधी रुग्णसेवेसाठी द्या अशी मागणी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या मागणीला देवस्थानांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय. लवकरच याबद्दल शासकीय आदेशही निघणार आहेत अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिलीये.

राज्यातील शिर्डी साई संस्थान, सिद्धीविनायक, लालबागचा राजा, पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीसह अनेक असे देवस्थान आहे जिथे भाविक लाखो रुपये सोन्या-चांदी दान देतात. या संस्थानांकडे आज कोट्यवधीची संपत्ती जमा झाली आहे. ही संपत्ती राज्यातील गरजू रुग्णांना मदत म्हणून देण्यात यावी असी मागणी पुढे आली. गिरीश महाजन यांनी याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आता मागणी केली असून ही संपत्ती रुग्णसेवेसाठी वापरावी यासाठी शासकीय अध्यादेश काढवा असा सल्लाही महाजन यांनी दिलाय. त्यामुळे मुख्यमंत्री श्रीमंत संस्थानांचे द्वारे उघडणार का हे पाहण्याचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 12, 2016 07:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close