S M L

प्रवाशांना 'असामाजिक तत्व' म्हणणार्‍या ओझांची तडकाफडकी बदली

Sachin Salve | Updated On: Aug 12, 2016 10:52 PM IST

प्रवाशांना 'असामाजिक तत्व' म्हणणार्‍या ओझांची तडकाफडकी बदली

12 ऑगस्ट : बदलापूरमध्ये झालेल्या रेल रोको आंदोलनात असामाजिक तत्व सहभागी झाले असा आरोप करणारे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अमिताभ ओझा यांना वक्तव्य चांगलंय भोवलंय. अमिताभ ओझा यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

बदलापूरच्या घटनेनंतर ओझा यांच्या बदलीचे आदेश देण्यात आले आहे.

बदलापूरच्या रेल्वे आंदोलनात असामाजिक तत्वांचा सहभाग होता असा आरोप मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अमिताभ ओझा यांनी केला होता. असामाजित तत्वांच्या सहभागामुळे हे आंदोलन जास्त चिघळलं असा दावाही ओझा यांनी केला होता. आंदोलक दोन-तीन गटांमध्ये होते त्यांच्या मागण्याही वेगवेगळ्या होत्या. त्या सगळ्यांना आश्वासनांची पत्रं द्यावी लागली.

लोकलच्या प्रवाशांच्या मागण्यांसंदर्भात 19 ऑगस्टला संध्याकाळी पाच वाजता बैठक बोलावली असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र आंदोलनात असामाजिक तत्व असल्याचं सांगत आंदोलनाला बदनाम करण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे का ? असा सवाल त्यामुळे उपस्थित झाला. अखेरीस प्रवाशांनाच असामाजिक तत्व म्हणवणार्‍या ओझांची तडकाफडकी बदली करण्यात आलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 12, 2016 07:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close