S M L

किडनी रॅकेट प्रकरणातील डॉक्टर खरोखर दोषी आहे का ? -गिरीश महाजन

Sachin Salve | Updated On: Aug 12, 2016 11:02 PM IST

किडनी रॅकेट प्रकरणातील डॉक्टर खरोखर दोषी आहे का ? -गिरीश महाजन

12 ऑगस्ट : हिरानंदानी हॉस्पिटल किडनी रॅकेट प्रकरणात अटकेतील डॉक्टरांचा बचाव वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी केलाय. किडनी रॅकेट प्रकरणात डॉक्टर खरोखर दोषी आहे का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.

किडनी रॅकेट प्रकरणी हिरानंदानी हॉस्पिटलमधल्या 5 डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. मात्र, हे डॉक्टर खरोखर दोषी आहेत का ? असा प्रश्न वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित केलाय. अवयव प्रत्यारोपणासाठी समितीमध्ये हॉस्पिटलचे प्रशासन आणि सरकारचा प्रतिनिधी असतात. या समितीनं कागदपत्रांची छाननी करून, पात्रदात्याच्या किडनीचं प्रत्यारोपण करण्याची परवानगी दिलेली असते. मग यात ऑपरेशन करणारे डॉक्टर खरंच दोषी आहेत का ?, याचा तपास केला पाहिजे असं महाजन म्हणाले.

मात्र, असं रॅकेट सुरू असल्याची कबुली त्यांनी दिली. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी अश्या प्रकारचा किडनी प्रत्यारोपणाचा गोरखधंदा सुरू असून 12 हजार रुग्ण किडणी प्रत्यारोपणाच्या प्रतिक्षेत असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकार आणि सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने अवयवदान बँक सुरु करणार असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 12, 2016 11:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close