S M L

महाड दुर्घटना : सावित्रीच्या तळाशी दुसरी बसही सापडली

Sachin Salve | Updated On: Aug 13, 2016 01:09 PM IST

mahad_day_2_newमहाड, 13 ऑगस्ट : महाडमध्ये नौदलाच्या स्कुबा डायवर्संना दुर्घटनास्थळापासून 500 मीटर अंतरावर नदीच्या तळाशी अवजड वस्तू सापडली आहे. ही अवजड वस्तू वाहून गेलेली दुसरी एस टी बस आहे का याचा शोध घेतला जात आहे. हे अवशेष बसचेच असल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे.

पावसाचा जोर ओसरल्यामुळे सावित्रीची पाणी पातळी कमी झालीये. त्यामुळे शोधकार्याला वेग आलाय. आज सावित्री नदीवर कोसळलेल्या पुलापासून 500 मीटर अंतरावर खोल तळाशी अवजड वस्तू लागलीये. ही वस्तू दुसरी बस असल्याची माहिती प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांनी दिलीये. नदीच्या तळाशी दृष्यमानता कमी असल्यानं शोधकार्याला वेळ लागतोय. सापडलेली ही वस्तू बाहेर काढण्यासाठी क्रेनही तयार आहे. दोन दिवसांपूर्वीच राजापूर-बोरीवली बस सापडली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 13, 2016 01:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close