S M L

स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाचा मान 182 विद्यार्थिनींना,पालिकेच्या शाळेचा स्तुत्य निर्णय

Sachin Salve | Updated On: Aug 13, 2016 05:15 PM IST

स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाचा मान 182 विद्यार्थिनींना,पालिकेच्या शाळेचा स्तुत्य निर्णय

सुरभी शिरपुरकर, नागपूर 13 ऑगस्ट : स्वातंत्र दिनाच्या दिवशी महानगरपालिकेच्या शाळेत शिकणार्‍या मुलींच्या हस्ते ध्वजारोहण करून मुलींना सक्षम करण्याचा अनोखा संदेश समाजाला देण्याचा निर्णय नागपूर महानगरपालिकेने घेतलाय. मनपा शाळेत शिकणार्‍या 182 विद्यार्थिनींना हा बहुमान मिळणार आहे.

स्वातंत्रदिनाच्या दिवशी शाळेत साजर्‍या होणार्‍या झेंडावंदनाच्या कार्यक्रमाची विद्यार्थ्यांना विशेष ओढ असते. पण नागपूरच्या रामदासपेठेतील महानगरपालिकेच्या मोर हिंदी विद्यालयात दहावीत शिकणार्‍या तन्वी मोटघरेला यंदाच्या स्वातंत्रदिनाची खास उत्सुकता आहे. कारण यावर्षी तन्वीच्या हस्ते तिच्या शाळेत ध्वजारोहण केलं जाणारे..

तन्वी सारख्याच 182 विद्यार्थिनींना यंदा प्रथमच ध्वजारोहणाची संधी देण्यात आलीये. नागपूर महानगरपालिकेचं त्यांच्या या उपक्रमामुळे सर्वत्र कौतुक होतंय.

नागपूर महानगर पालिकेच्या वतीने या कार्यक्रमामुळे 'बेटी बचाव बेटी पढाओ' हा नारा सार्थक केला आहे. देशात पहिल्यांदाच अशा पद्धतीने ध्वजारोहणचा कार्यक्रम विद्यार्थिनीच्या हस्ते आयोजित केला जात आहे.

'बेटी बचाओ बेटी पढाओ' असा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलाय. हाच संदेश जनमानसात रूजवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येतोय.

स्वातंत्र्यदिनानिमित्त सुरू होणारा हा उपक्रम समाजाला निश्चितच एक नवी दिशा दाखवण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहे. अशा पद्धतीने स्वातंत्र्यदिन साजरा झाला तर तो खर्‍या अर्थाने सार्थक होईल हे निश्चित..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 13, 2016 05:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close