S M L

'शनीच्या नावाने...', शिंगणापुरात बंद टोलवर भाविकांची लूट

Sachin Salve | Updated On: Aug 13, 2016 07:32 PM IST

'शनीच्या नावाने...', शिंगणापुरात बंद टोलवर भाविकांची लूट

13 ऑगस्ट : गेल्या दहा वर्षांपासुन यात्रेकरू कराच्या नावाखाली सुरू असलेली शिंगणापूरची टोलवसुली जिल्हा परिषदेने बंद करण्याचे आदेश दिलेले असतानाही आजही सुरू आहे. दररोज हजारो भाविक शिंगणापूर येथे येत असतात यांच्याकडून आजही राजरोस ही वसुली केली जात आहे.

ग्रामपंचायतला उत्पन्नाचे साधन म्हणून शिंगणापुरात येणार्‍या प्रत्येक भक्ताकडून यात्रेकरू कर घेण्याची परवानगी जिल्हा परिषदेच्या स्थायी समीतीने दिली होती. काही आणि शतीर्ंवर सुरू असलेली ही टोलवसुली गेल्या दहा वर्षांपासुन सुरू आहे. पण आता पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने गेल्या महिन्यात 14 तारखेला हा नाका बंद करण्याचे आदेश दिले. तरीही भक्तांकडून प्रवेश कर घेणे मात्र सुरूच आहे.

शिंगणापूर देवस्थान आणि ग्रामपंचायत यांच्यात कुठेही समन्वय असल्याचं दिसत नाही. एकमेकांशी राजकीय विरोध असणार्‍या लोकांची सत्ता या संस्थावर असल्याने भाविकांना मात्र याचा फटका बसताना दिसतोय. ही बेकायदेशीर टोलधाड कधी बंद होणार आणि शिंगणापूर येथे येणार्‍या भाविकांना चांगल्या सुविधा कधी मिळणार हाच खरा प्रश्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 13, 2016 07:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close