S M L

#महाडदुर्घटनाः पाण्याबाहेर काढलेल्या तवेरात सापडले 2 मृतदेह

Samruddha Bhambure | Updated On: Aug 14, 2016 06:05 PM IST

#महाडदुर्घटनाः पाण्याबाहेर काढलेल्या तवेरात सापडले 2 मृतदेह

Taverajpg

14 ऑगस्ट : महाडजवळच्या सावित्री नदीवरील पूल कोसळल्यानं वाहून गेलेल्या वाहनांचा आता एकामागून एक शोध लागायला सुरुवात झाली आहे. वाहनांना शोधण्यासाठी सुरू असलेल्या शोधकार्यादरम्यान अखेर पाण्यात बुडालेल्या तवेरा गाडीचा शोध लागला आहे. या गाडीत 2 मृतदेह सापडले आहेत. संतोष वाझे आणि दत्ताराम भागोजी मिरगळ अशी या मृतांची नावं आहेत.

गेल्या मंगळवारी ( 2 ऑगस्ट) रात्री साडेअकरा वाजता सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल कोसळला होता. तुफान पाऊस आणि पुराच्या तडाख्यामुळे घडलेल्या या भीषण दुर्घटनेत, कोकणातून मुंबईकडे येणार्‍या दोन एसटी बस आणि तवेरा कार पुरात वाहून गेली होती. त्यापैकी एका एसटीचा सांगाडा गुरुवारी, आठ दिवसांच्या अथक प्रयत्नांतर नौदलाच्या डायव्हिंग टीमला दिसला होता. त्यानंतर काल 500 मीटरवर त्यांना जयगड-मुंबई एसटीचा सांगाडाही सापडला होता. रात्री उशिरा हा सांगडा बाहेर काढण्यात आला.

त्यानंतर तवेरा कार शोधण्याचं आव्हान नेव्ही आणि एनडीआरएफपुढे होतं. पुलापासून साधारण 300 मीटर अंतरावर त्यांना तवेराचा सांगाडा दिसला. 4 ते 5 मीटर खोल पाण्यात तो अडकला होता. तो बाहेर काढण्यात आला असून त्यात दोन पुरुषांचे मृतदेह सापडले आहेत. या कारमधून एकूण आठ प्रवासी मुंबईकडे निघाले होते. त्यांच्यापैकी काहींचे मृतदेह आधी सापडले होते. मात्र 4 अजूनही बेपत्ता आहेत.

दरम्यान, महाडजवळच्या सावित्री नदीवरील पूल कोसळल्यानं वाहून गेलेल्या दोन्ही एसटी बस आणि तवेरा गाडीचा सांगाडा सापडल्यानंतर आज (रविवारी) तेराव्या दिवशी शोधकार्य थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. या दुर्घटनेत बुडालेल्या 42 प्रवाशांपैकी आज सापडलेल्या 2 मृतदेहासह एकूण 28 मृतदेह सापडले आहेत, तर 14 बेपत्ता आहेत.

महाड दुर्घटनेचा घटनाक्रम :

- 3 ऑगस्टला महाडमधील सावित्री नदीवरील जुना पूल तुटला

- यात 2 एसटी बस आणि दोन गाड्या वाहून गेला होत्या

- घटनेच्या दुसर्‍या दिवशी 40 जण बेपत्ता असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं होते

- एसटी बससह तवेरा गाडी बेपत्ता असल्याचं सरकारने सांगितलं

- एनडीआरएफचे 4 पथक, नौदल आणि तटरक्षक दलाचे जवान शोधकार्यात लागले होते

- स्थानिक मच्छीमारांनी शोधकार्य सहभाग

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी घटनास्थळाची केली पाहणी

- घटनेच्या चौथ्या दिवशी एसटीतील महिलांसाठी राखीव असलेला बोर्ड मिळाला होता

- आतापर्यंत 26 जणांचे मृतदेह सापडले आहे, 14 जण बेपत्ता आहे

- दुर्घटनेच्या नवव्या दिवशी जयगड राजापूर-बोरीवली एसटी अपघातग्रस्त पुलापासून 150 मीटरवर सापडली

- काल 12 व्या दिवशी दुसरी बस जयगड

- मुंबई दुर्घटनाग्रस्त पुलाच्या 500 मीटरवर सावित्री नदीच्या पात्रात सापडली

- आज 13 व्या दिवशी दुर्घटनाग्रस्त पुलापासून 400 मीटर अंतरावर तवेरी गाडी ही मिळाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 14, 2016 01:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close