S M L

रिओ ऑलिम्पिक : दीपा कर्माकरवर भारतीयांची नजर

Samruddha Bhambure | Updated On: Aug 14, 2016 03:32 PM IST

रिओ ऑलिम्पिक : दीपा कर्माकरवर भारतीयांची नजर

14 ऑगस्ट :  जिम्नॅस्टिक्समधील भारताची एकमेव महिला खेळाडू बनून आधीच विक्रम केलेल्या दीपा कर्माकरने व्हॉल्ट प्रकारात अंतिम फेरी गाठून सार्‍या जगाला आश्चर्याचा धक्का दिला. आज भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजून 27 मिनिटांनी दीपाची कर्तबगारी भारतीयांना पाहता येणार आहे. त्यामुळे सर्व भारतीय पदकाच्या आशेने दीपावर नजर ठेवून आहेत.

दीपा कर्माकरनं व्हॉल्ट प्रकारात 14.850 गुणांची कमाई करुन आठवं स्थान मिळवून फायनलमधलं आपलं स्थान पक्कं केलं होतं. दीपानं व्हॉल्ट प्रकारात पहिल्या प्रयत्नातच 15.100 गुणांची कमाई केली.

दुसर्‍या प्रयत्नात दीपानं 14.600 गुण मिळवले होते. 22 वषच्य दीपा ऑलिम्पिकची फायनल गाठणारी पहिलीच भारतीय महिला जिम्नॅस्ट ठरली आहे. त्यामुळे तिला पदक मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 14, 2016 03:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close