S M L

थरूर यांच्या ट्विटरचा वाद रंगला

13 एप्रिलट्विटरवर केलेल्या विधानांवरून आता आयपीएलचे संचालक ललित मोदी आणि शशी थरूर यांच्यात वादाला सुरुवात झाली आहे. आयपीएलमध्ये नव्याने दाखल झालेल्या रॉन्देव्हूच्या कोची टीमच्या मालकी हक्कांवरून हा वाद रंगला आहे. कोची टीममध्ये कोणाचा किती वाटा आहे, याची माहिती ललित मोदी यांनी ट्विटरवर उघड केली आहे. या टीममध्ये परराष्ट्र राज्यमंत्री शशी थरूर यांच्या निकटवर्तीय सुनंदा पुष्कर यांचा 18 टक्के वाटा असल्याचे ललित मोदींनी म्हटले आहे. तर रॉन्देवू स्पोर्ट्सने हा वाटा फक्त चार टक्के असल्याचे स्पष्ट केले आहे. पण अशा प्रकारे टीमबद्दलची माहिती उघड करण्यास रॉन्देवूने आक्षेप घेतला आहे. रॉन्देवू स्पोर्ट्सने या प्रकरणी आता मोदी यांना नोटीस बजावली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनीही याप्रकरणी मोदींना खडसावले आहे. मोदींच्या ट्विटरबाजीनंतर थरूर यांचे निकटवर्तीय असलेल्या जोसेफ जेकब यांनी ललित मोदी ड्रग पॅडलर असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच राजस्थान रॉयल्स टीमच्या स्टेक होल्डर्सची नावे मोदी का जाहीर करत नाहीत, अशी विचारणाही केली आहे. हायकमांडने घेतली दखलआयपीएलमधील कोची टीमवरून सुरू असलेल्या या वादाची दखल हायकमांडने घेतली आहे. मंत्री शशी थरूर यांच्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांनी सोनिया गांधींची भेट घेतली. 10 जनपथ या सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी राजीव शुक्लाही सोबत होते. सध्या सुरू असलेल्या या वादावर काँग्रेसची भूमिका ठरवण्यासाठी ही भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र भेटीचे कारण वेगळे होते. त्यात थरूर यांच्या मुद्द्यावर चर्चा झाली नसल्याचा दावा शुक्ला यांनी भेटीनंतर केला. हा मुद्दा बीसीसीआयचा आहे. याबाबत बीसीसीआय दहा दिवसांच्या आत बैठक घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ललित मोदी आक्रमकललित मोदी यांनीही या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. आयपीएल टीमच्या स्टेक होल्डर्सची नावे उघड करण्यात काही गैर नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. 'सीएनएन-आयबीएन'शी बोलताना त्यांनी आपल्या ट्विटरवरच्या विधानांचे समर्थनच केले आहे.प्रत्येक टीमने आपल्या स्टेकहोल्डर्सची नावे यापूर्वी जाहीर केली आहेत. आणि लोकांनाही ती माहीत आहेत. त्यामुळे कोची टीमला स्टेक होल्डर्सची नावे गोपनीय का ठेवायची आहेत, याची मला कल्पना नाही. सुनंदा पुष्कर कोण आहेत याच्याशी मला घेणे-देणे नाही. फक्त त्यांचे नाव का लपवले जाते आहे, हा प्रश्न आहे. टीमचे स्टेक होल्डर्स कोण आहेत, याची चौकशी करू नका, असे शशी थरूर यांनीच आपल्याला सांगितल्याचेही ते म्हणाले.थरूर यांचे स्पष्टीकरणशशी थरुर यांनी या वादावर स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणतात...रॉन्देव्हूच्या प्रतिनिधींनी माझ्याशी संपर्क साधून आयपीएल टीमच्या लिलावासाठी मार्गदर्शन करण्याची विनंती केली. माझी यामध्ये मेंटरची भूमिका होती. आम्ही ललित मोदींशी अनेक वेळा चर्चा केली. त्यांनी स्वतःला एक एक सच्चा मित्र असल्याचे भासवले. आयपीएल टीमसाठीच्या लिलावाची प्रक्रिया खुली आणि पारदर्शक होती. रॉन्देव्हूच्या अनपेक्षित यशामुळे अनेक बडे इच्छुक नाराज झाले. टीम इतर राज्यातल्या दुसर्‍या शहरात जाण्यासाठी रॉन्देव्हूने ही बोली सोडावी यासाठी मोदी आणि इतर अनेकांनी रॉन्देव्हूच्या प्रतिनिधींवर दबाव टाकण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मोदींचे आरोप मला अमान्य आहेत. काही प्रश्न अनुत्तरीतपण या सगळ्या ट्विटरबाजीनंतरही काही प्रश्न अनुत्तरीत आहेत...कोची टीमच्या स्टेक होल्डर असलेल्या सुनंदा पुष्कर यांच्याशी निकटचे संबंध असल्याचं शशी थरूर यांनी अमान्य का केले?कोची टीमसाठी कोटींची बोली लावणार्‍या फ्रॅन्चायजीची पार्श्वभूमी काय आहे?राजस्थान रॉयल्सच्या मालकी हक्कांची माहितीही जाहीर का केली गेलेली नाही?कोचीच्या ऐवजी अहमदाबादला संधी देण्याचा प्लॅन होता का?

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 13, 2010 10:21 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 13, 2010 10:21 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close