S M L

मंगल जेधे खून प्रकरणः आतापर्यंत 6 खून केल्याची आरोपीची कबुली

Samruddha Bhambure | Updated On: Aug 15, 2016 07:12 PM IST

मंगल जेधे खून प्रकरणः आतापर्यंत 6 खून केल्याची आरोपीची कबुली

15 ऑगस्ट : सातार्‍यातल्या मंगल जेधे खून प्रकरणी तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. मंगल जेधेचा खून केल्याची कबुली डॉ. संतोष पोळ यानं दिली आहे. इतकंच नाही तर आपण आतापर्यंत 6 खून केल्याचंही त्यानं पोलीस कोठडी दरम्यान पोलीस तपासात मान्य केलं आहे. त्यामध्ये 5 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.

मंगला जेधे हत्याप्रकरणी अटक केल्यानंतर पोलिसांच्या चौकशीत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्व हत्या डॉ. पोळ याने आपल्या फार्म हाऊसवर बोलावून केल्याचंही कबूल केलं आहे. मंगला जेधे या 16 जूनपासून सातार्‍यातून बेपत्ता होत्या. बेपत्ता होण्याआधी मंगला जेधे आणि संतोष पोळ यांचं कडाक्याचं भांडण झालं होतं. तेव्हापासून डॉ. पोळ बेपत्ता होता. पण एका नर्सची चौकशी केल्यानंतर संतोष पोळचा सुगावा लागला आणि मुंबईतील दादरमधून पोलिसांनी संतोष पोळच्या मुसक्या आवळल्या.

डॉक्टर की कसाई?

- मंगल जेधे खून प्रकरण वाईमध्ये घडलं

- 16 जूनपासून मंगल जेधे बेपत्ता

- खून झाल्याचं 12 ऑगस्टला उघडकीला

- संशयाची सूई डॉक्टर संतोष पोळवर

- मंगल जेधे शेवटपर्यंत डॉक्टर संतोष पोळच्या संपर्कात

- संशयावरून 12 ऑगस्टला डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात

- तपासादरम्यान मंगलचा खून करून फार्महाऊमध्ये मृतदेह पुरल्याची डॉक्टर पोळची कबुली

- 13 ऑगस्टला 5 दिवसांची पोलीस कोठडी

- 2003पासून वाई परिसरातून 5 ते 6 महिला बेपत्ता

- मंगलसह आणखी 5 जणांचे खून केल्याची कबुली

हत्या करण्यात आलेले 4 मृतदेह संतोष पोळच्या फार्म हाऊसमध्येच सापडले आहेत. सहावा मृतदेह धोम धरणात फेकून देण्यात आल्याचंही कळतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 15, 2016 07:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close