S M L

विधानभवन परिसरात पोलिसांचा पत्त्यांचा डाव

13 एप्रिलगुप्तचर यंत्रणांच्या इशार्‍यानंतर विधानभवन परिसरातील सुरक्षा कडेकोट करण्यात आली. अगदी मुख्यमंत्र्यांसह सर्व आमदारांना गेटपासून चालत येण्याचे फर्मान निघाले. त्याची अमलबजावणीही कोटेकोरपणे सुरू झाली.पण आता हीच सुरक्षा सांभाळणारे पोलीस मात्र या परिसरात खुशाल पत्ते खेळत बसतात, असे उघडकीस आले आहे. आणि ही बाब उघड केली आहे, शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी. त्यांनी आपल्या मोबाईलमधून या पत्त्यांच्या डावांचे फोटोच काढून सभागृहाला दाखवले. या मुद्यावरुन विधानपरिषदेत सभासदांनी एकच गोंधळ घातला. सभागृहाची भावना लक्षात घेऊन लवकरात लवकर या गोष्टीची दखल घेऊन त्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन अखेर सभापतींनी दिले.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 13, 2010 12:11 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 13, 2010 12:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close