S M L

मुलीशी बोलला म्हणून तरुणाला मारहाण, नैराश्यातून तरुणाची आत्महत्या

Sachin Salve | Updated On: Aug 16, 2016 02:15 PM IST

मुलीशी बोलला म्हणून तरुणाला मारहाण, नैराश्यातून तरुणाची आत्महत्या

बारामती, 16 ऑगस्ट : मुलीशी फोनवर बोलत असल्याच्या संशयावरून एका तरुणाला त्याच्या कुटुंबीयांसमोर बेदम मारहाण करण्यात आली. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही, सर्व कुटुंबाला मुलीच्या नातेवाईकांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागायला लावली.

यातून आलेल्या नैराश्यातून बारामती तालुक्यातील देऊळगाव रसाळ येथील संतोष बाळासाहेब रसाळ (26) या युवकानं शेतात गळफास घेवून आत्महत्या केलीये. या प्रकरणामुळं तालुक्यात एकच खळबळ उडालीय.

नेमका हा प्रकार प्रेमप्रकरणातून झालाय की छेडछाडीच्या संशयावरून झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अतिशय गरीब असलेल्या रसाळ कुटुंबीयांना या घटनेमुळं प्रचंड मानसिक धक्का बसलाय. दरम्यान, संतोष रसाळ याच्या मृतदेहाचं अद्याप शवविच्छेदन झालं नसून संबंधित मारहाण करणार्‍या लोकांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा रसाळ कुटुंबीय आणि त्यांच्या नातेवाईकांनी घेतलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 16, 2016 02:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close