S M L

परवाने मिळण्यासाठी मराठी भाषा आवश्यक का नाही?, राज यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Samruddha Bhambure | Updated On: Aug 17, 2016 01:11 PM IST

Raj thackray

17 ऑगस्ट :  राज्यात वाहन परवाने देताना मराठी भाषा येणं सक्तीचं नाही, याचा अर्थ सरकारला हे परवाने परप्रांतियांनाच द्यायचे आहेत का, असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सरकारवर सडकून टीका केली.

राज ठाकरे आज (बुधवारी) सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी वर्षा बंगल्यावर गेले होते. मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांनी सुमारे अर्धा तास चर्चा केली. यानंतर कृष्णकुंज बंगल्यावर घेतलेल्या पत्रकारपरिषदेत त्यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा मराठी भाषेचा आणि परप्रांतियांचा मुद्दा उपस्थित केला आहे.

महाराष्ट्रातील गोष्टींचा फायदा इथल्या लोकांना झाला पाहिजे. येथील रोजगार आणि वाहन परवान्यांच्या वाटपामध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळाले पाहिजे. आयटी कंपन्यांना करात सवलती द्यायची, त्यासाठी कंपनीला जागाही कमी दरात उपलब्ध करून द्यायची आणि तरी देखील त्यात मराठी माणसांना नोकर्‍या देणार नसाल तर काय उपयोग, असा सवाल करत राज ठाकरे यांनी राज्य शासनाला वेटीस धरलं.

तसंच मराठी भाषेला अभिजात दर्जेचा भाषा मिळावा यासाठी मनापासून प्रयत्न करावेत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे राज यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 17, 2016 01:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close