S M L

अर्जुन खोतकर यांच्यावर 500 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

Samruddha Bhambure | Updated On: Aug 17, 2016 09:40 PM IST

 अर्जुन खोतकर यांच्यावर 500 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

17 ऑगस्ट :   राज्याचे दुग्ध आणि पशुसंवंर्धन राज्यमंत्री आणि शिवसेनेचे जालन्यातील नेते अर्जुन खोतकर यांच्यावर 'आप'च्या नेत्या प्रीती शर्मा-मेनन यांनी थेट कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) 500 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप केले आहेत. जालना 'एपीएमसी'मधील तब्बल 250 गाळ्यांचं वाटप केवळ 40 लोकांमध्ये करण्यात आलं असून लाभार्थी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप प्रीती शर्मा-मेनन यांनी मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत प्रीती शर्मा-मेनन यांनी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. जालना 'एपीएमसी' घोटाळ्यातून राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी कोट्यावधी रूपये लाटले असल्याचा आरोपही प्रीती शर्मा-मेनन यांनी यावेळी केला. खोतकर यांची मोठी दहशत असून त्यांच्याविरूद्ध बोलणार्‍यांचे खून होतात असा आणखी एक गंभीर आरोप शर्मा-मेनन यांनी करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. तसंच राज्यमंत्री अर्जुन खोतकरांच्या सर्व व्यवहारांची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही प्रीती शर्मा-मेनन यांनी केली आहे.

दरम्यान, 'आप'च्या नेत्या प्रीती शर्मा-मेनन यांनी आपल्यावर केलेल्या आरोपात काहीही तथ्य नसल्याचं म्हणत, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी शर्मा-मेनन यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 17, 2016 06:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close