S M L

साक्षी आम्हाला तुझा अभिमान आहे - पंतप्रधान मोदी

Samruddha Bhambure | Updated On: Aug 18, 2016 06:33 PM IST

साक्षी आम्हाला तुझा अभिमान आहे - पंतप्रधान मोदी

18 ऑगस्ट : रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणारी साक्षी मलिकने देशाला रक्षाबंधनच्या शुभदिनी अनोखे भेट दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ट्विटरवरून साक्षीचे अभिनंदन केलं आहे.

साक्षी मलिकने इतिहास रचला आहे. संपूर्ण देश खुश आहे. रक्षाबंधनच्या शुभदिनी भारताच्या मुलीने पदक जिंकून देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. आम्हाला साक्षीचा अभिमान आहे, असं मोदींनी ट्विटरवरील संदेशात म्हटले आहे. 

याशिवाय, राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनीदेखील कांस्यपदक मिळवल्याबद्दल साक्षीचे अभिनंदन केलं आहे.

रिओ ऑलिम्पिक स्पर्धेच्या 12 व्या दिवशीभारताला पदक मिळवून देणारी साक्षी मलिक पहिली महिला कुस्तीपटू ठरली आहे. तिने 58 किलो वजनी गटात भारताला पहिले कांस्य पदक मिळवून दिले. 8-5 अश्या गुणांसह साक्षीने किर्गिजस्तानच्या आयसुलू तायनाबेकोव्हरला पराभूत केलं.

दरम्यान रेल्वे विभागाने साक्षीला 50 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. तसेच उत्तर रेल्वेमध्ये पदोन्नतीही देणार आहे. साक्षी ही सध्या रेल्वेमध्ये वरिष्ठ लिपीक म्हणून काम करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 18, 2016 12:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close