S M L

कुस्तीपटू नरसिंग यादवचं ऑलिम्पिकचं स्वप्न भंगलं, वाडाकडून 4 वर्षांची बंदी

Samruddha Bhambure | Updated On: Aug 19, 2016 01:26 PM IST

narsing_yadav

18 ऑगस्ट :  बंदी घालण्यात आलेले उत्तेजक द्रव्य सेवन केल्याप्रकरणी भारतीय कुस्तीपटू नरसिंग यादव याच्यावर 4 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. क्रीडा लवाद न्यायालयानं हा निर्णय दिला. त्यामुळं आता नरसिंग ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊ शकणार नाही.

बंदी घालण्यात आलेले मिथॅनडिओनोन हे उत्तेजक नरसिंगच्या शरीरात सापडल्याचे राष्ट्रीय उत्तेजकसेवनविरोधी संघटनेने (नाडा) स्पष्ट केलं होतं. त्यावरून त्याच्यावर टांगती तलवार होती. या प्रकरणाची सुनावणी क्रीडा लवाद कोर्टासमोर झाली. उत्तेजक द्रव्य चाचणीत नरसिंग दोषी आढळून आला आहे. त्याच्याविरोधात कोणतेही कटकारस्थान रचल्याचे पुरावे सापडलेले नाहीत. त्यामुळे त्याच्यावर 4 वर्षांची बंदी घालण्यात आल्याचा निर्णय क्रीडा लवाद कोर्टानं दिला. उद्यापर्यंत रिओ ऑलिम्पिक व्हिलेज रिकामे करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 19, 2016 12:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close