S M L

संतोष पोळच्या घराजवळ सापडला वनिता गायकवाडचा मृतदेह

Samruddha Bhambure | Updated On: Aug 19, 2016 10:13 PM IST

Santosh Pol231

19 ऑगस्ट :  सातर्‍यातील वाईचा खुनी डॉक्टर संतोष पोळ याच्या घराजवळ पोलिसांनी केलेल्या खोदकामात त्याने खून केलेल्या वनिता गायकवाडचा सांगाडा आज (शुक्रवारी) दुपारी सापडला आहे.

संतोष पोळने 2006 मध्ये वनिता गायकवाड यांचा खून करून त्यांचा मृतदेह पुरला होता. याआधी संतोष पोळने वनिता गायकवाड यांचा मृतदेह कृष्णा नदीत टाकून दिल्याचे पोलिसांना सांगितले होते. पण नंतर त्याने हा मृतदेह पाण्यात टाकला नसून, तो धोम येथील शेतघराजवळच पुरल्याचे म्हटले होते. वनिता गायकवाड यांचा मृतदेह कुठे पुरला याची जागाही त्याने पोलिसांना दाखवली. त्यानंतर पोलिसांनी तिथे खोदण्यास शुक्रवारी सकाळी सुरुवात केली. खोदल्यानंतर घटनास्थळी साडीचे तुकडे आणि हाडांचे अवशेष आढळल्याची माहिती सातार्‍याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी दिली.

दरम्यान, संतोष पोळ याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला शुक्रवारी वाई न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत 25 ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 19, 2016 07:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close