S M L

खडसेंना आणखीन एक धक्का, महसुल मंत्री असतानाचे एक हजार कोटींचं कंत्राट रद्द

Samruddha Bhambure | Updated On: Aug 20, 2016 08:23 PM IST

devendra-fadnavis-with-eknath-khadse_650x400_41463937569

20 ऑगस्ट :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मंजूर केलेले एक हजार कोटा रुपयांचे टेंडर रद्द केल्याने खडसेंना हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

जमीन गैरव्यवहार आणि अन्य इतर आरोपांमुळे आपले मंत्रिपद गमवावे लागलेले खडसे यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असताना त्यांना आता एक नवा धक्का मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. खडसे हे महसूलमंत्रिपदावर कार्यरत असताना त्यांनी बडय़ा कंपन्यांना फायदा पोहचवण्यासाठी मंजूर केलेल्या एक हजार कोटींच्या निविदा रद्द करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या या आदेशामुळे खडसेंना एकप्रकारे धक्का दिल्याचे समजत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 20, 2016 08:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close