S M L

मुंबईकरांना विजयी भेट

13 एप्रिलब्रेबॉर्न स्टेडियमवर रंगलेल्या मॅचमध्ये सचिनच्या मुंबई इंडियन्सने मुंबईकरांना विजयाची आणखी एक भेट दिली. मुंबईने दिल्ली डेअरडेव्हिल्सचा 39 रन्सने पराभव करत स्पर्धेतील 9व्या विजयाची नोंद केली. या पराभवामुळे दिल्लीचे सेमीफायनल प्रवेशाचे आव्हान मात्र आणखी कठीण झाले आहे. पहिली बॅटिंग करणार्‍या मुंबई इंडियन्सनं 4 विकेट गमावत 184 रन्सचा बलाढय स्कोर उभा केला. फॉर्मात असलेल्या सचिन तेंडुलकरने 30 रन्स केले. तर मधल्या फळीतही सौरभ तिवारी, अंबाती रायडू आणि ड्युमिनीनं चांगली बॅटिंग करत स्कोअर वाढवला. पण मॅचमध्ये खरी रंगत आणली ती कायरन पोलार्डने. अवघ्या 13 बॉलमध्ये पोलार्डनं नॉटआऊट 45 रन्स करत मुंबईला मोठा स्कोर उभा करुन दिला. याला उत्तर देताना दिल्लीची सुरुवात चांगली झाली. डेव्हिड वॉर्नर आणि वीरेंद्र सेहवागने पहिल्या विकेटसाठी 39 रन्सची पार्टनरशिप केली. पण वॉर्नर आऊट झाला आणि यानंतर दिल्लीचे इतर बॅटसमन झटपट पॅव्हेलिअनमध्ये परतले. दिल्लीची टीम अवघ्या 144 रन्सवर ऑलआऊट झाली.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 13, 2010 06:13 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 13, 2010 06:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close