S M L

नाशिकच्या सायखेडा बाजारात कांद्याला फक्त 5 पैसे किलोचा भाव

Samruddha Bhambure | Updated On: Aug 23, 2016 10:24 PM IST

Onion farmer213

23 ऑगस्ट : नाशिकमध्ये सायखेडा बाजारात कांद्याला फक्त पाच पैसे प्रतिकिलोचा दर मिळाला आहे. शेतीमाला मिळणार्‍या या भावाने उद्विग्न झालेला शेतकरी उद्वस्त होत आहे.

कांद्याच्या भावात आज (मंगळवारी) ऐतिहासिक पडझड झाली आणि पिंपळगावच्या सायखेडा उपबाजार समितीत सुधाकर दराडे नावाच्या शेतकर्‍याला फक्त 5 पैसे किलोचा भाव मिळाला. 5 रुपये प्रति क्विंटल कांदा विकावा लागणार, या भावनेने हताश झालेल्या दराडेंनी कांदा न विकता परत आणला आणि उद्विग्न होऊन खत म्हणून तो शेतात फेकून दिला.

काही दिवसांपूर्वी केंद्र आणि राज्य सरकारने शेतकर्‍याचा कांदा विकत घेण्याची तयारी केली होती. त्यामुळे शेतकर्‍यांना थोडा दिलासा मिळाला होता. मात्र कष्टाने पिकवलेला, आठ महीने दुष्काळ, संप, आंदोलन, अतिवृष्टीच्या संकटापासून जगवलेला कांदा मातीमोल होताना पाहण्याची वेळ नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकर्‍यांवर आली आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 23, 2016 10:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close