S M L

हायकोर्टाच्या निर्णयानंतर तृप्ती देसाई हाजी अली दर्ग्यात

Samruddha Bhambure | Updated On: Aug 28, 2016 08:04 PM IST

हायकोर्टाच्या निर्णयानंतर तृप्ती देसाई हाजी अली दर्ग्यात

28 ऑगस्ट : भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी आज (रविवारी) मुंबईतील हाजी अली दर्ग्यात जाऊन दर्शन घेतलं. मात्र त्यांनी न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन केलं नाही.

हाजी अली दर्ग्यातील 'मझार'च्या परिसरात महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिल्यानंतर तृप्ती देसाई यांनी महिला कार्यकर्त्यांसोबत दर्ग्यात हजेरी लावली. दर्गामध्ये प्रवेश करताना यावेळी कोणताही विरोध झाला नसल्याने, अधिक आनंद झाल्याचं तृप्त देसाई यांनी सांगितल. तसंच, मुस्लीम महिलांकडूनही पाठिंबा मिळत असल्याने अधिक आनंद झाल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, हाजी अली दर्ग्यात सध्या विशिष्ट मर्यादेपर्यंतच महिलांना परवानगी आहे. दर्ग्यातील 'मजार-ए-शरीफ'मध्ये महिलांना प्रवेश करण्यास मनाई आहे. विश्वस्तांनी या निकालाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यासाठी वेळ मागितला होता. त्यामुळे निकालाला स्थगिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. दर्गा विश्वस्तांची ही मागणी कोर्टाने मान्य करत निकालाला सहा आठवड्यांची स्थगिती दिली आहे. त्यामुळे  तृप्ती देसाई यांनी सध्या विशिष्ट मर्यादेपर्यत दिल्या जाणाऱ्या प्रवेशाच्या नियमांचे पालन करत दर्शन घेतलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 28, 2016 05:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close