S M L

....तर अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा, राज ठाकरे यांची थेट मागणी

Samruddha Bhambure | Updated On: Aug 30, 2016 02:41 PM IST

Raj thackray

30 ऑगस्ट :   'जाती आणि जन्मावर आधारित कायदे हवेतच कशाला,' असा सवाल करताना, 'कायद्याचा जर गैरवापर होत असेल तर अॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करायला हवा, त्याऐवजी दुसरा कायदा आणायला हवा,' असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पक्ष कार्यकर्त्यांचा विश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला.

मुंबईतील यशंवत नाट्यगृहात झालेल्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. मराठी आणि हिंदूंचे सण संपवण्याचं कारस्थान सुरू आहे, असंही ते यावेळी म्हणाले. मुंबईत वाहतूक पोलिसावर झालेल्या हल्ल्याचा संदर्भ देत कायद्याचा कुठलाही धाक राहिला नसल्याचे त्यांनी सांगितलं. तसंच कठोर कायदे नसल्यामुळे बलात्काराचे गुन्हे सर्रास घडतात. हे गुन्हे रोखायचे असतील तर सौदी अरेबियासारख्या कठोर कायद्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.

निवडुणकीतील यशापयशाची मला चिंता नाही. माझ्या पक्षाचे किती आमदार निवडून येतात, यानं मला काहीही फरक पडत नाही. माझी सत्ता रस्त्यावर चालते,' असं सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पक्ष कार्यकर्त्यांचा विश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 30, 2016 02:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close