S M L

विलास शिंदेंना 'शहीद' दर्जा, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Samruddha Bhambure | Updated On: Sep 1, 2016 09:03 AM IST

विलास शिंदेंना 'शहीद' दर्जा, मुख्यमंत्र्यांची घोषणा

31 ऑगस्ट : बाईकस्वाराच्या भावाने केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास शिंदे यांना 'शहीद' दर्जा दिला जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. शिंदे यांचा मृत्यू दुदैर्वी असून हल्लेखोरांवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे.

विलास शिंदे यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरळीतील पोलीस कॉलनीत जाऊन शिंदे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केलं. मुख्यमंत्री कॉलनीत दाखल होताच पोलिसांच्या कुटुंबीयांच्या रोषाचा त्यांना सामना करावा लागला. पोलिसांच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणाबाजी करत महिलांनी परिसर दणाणून सोडला. महिलांनी मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्नदेखील केला. आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी मागणीही या महिलांनी केली.

शेवटी या घेरावातून मार्ग काढत  देवेंद्र फडणवीस यांनी विलास शिंदे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. शिंदे कुटुंबीयांचे सांत्वन करुन बाहेर पडल्यावर फडणवीस यांनी आरोपींवर कठोर कारवाईचं आश्वासन दिलं. सरकार शिंदे कुटुंबीयांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहिल असंही त्यांनी सांगितलं. तर पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनीदेखील विलास शिंदे यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आम्ही शिंदे कुटुंबीयांसमवेत आहेत असं सांगितलं.

दरम्यान, विलास शिंदे यांच्या निधनानंतर मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. खारमध्ये जिथे विलास शिंदेंवर हल्ला झाला तिथे जाऊन मनसे कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. मनसे कार्यकर्त्यांनी चौकात लागलेल्या कुरेशी या फलकाची कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. विलास शिंदे अमर रहे अशी घोषणाबाजीही मनसेच्या कार्यकर्त्यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 31, 2016 07:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close