S M L

आयपीएल वादाला नवनवीन वळणे

15 एप्रिलआयपीएलमधील कोची टीमवरून सुरू झालेल्या वादाला आता नवनवीन वळणे मिळू लागली आहेत. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनीसुद्धा आता या मोदी विरुद्ध थरुर या वादात भाग घेतला आहे. कोची टीमसाठी बोली लावणार्‍या काही जणांना ही टीम अहमदाबादसाठी हवी होती. त्यासाठी चार जणांच्या समितीने आपली भेट घेऊन कोची टीम अहमदाबादला स्थलांतरीत करण्यासाठी मदत करावी, अशी विनंती केल्याचा गौप्यस्फोट पवारांनी केला आहे. 'आयबीएन-लोकमत'शी बोलताना पवारांनी हे कबूल केले. पण त्या व्यक्तींची नावे सांगायला मात्र पवारांनी नकार दिला. दुसरीकडे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनीही गुंतवणूकदारांनी आपली भेट घेतली होती, असे सांगितले आहे. पवारांचा सल्लारॉन्देवूने कोची टीममध्ये कोट्यवधी रुपये गुंतवलेले नाहीत. एवढे पैसे गुंतवण्याएवढे पैसे आपल्याजवळ नाहीतच. असे या ग्रुपचे सीईओ शैलेंद्र गायकवाड यांनी म्हटले आहे. तर कोची टीममध्ये पैसा गुंतवण्याचा शरद पवारांनीच सल्ला दिल्याचे रोन्देवूचे प्रवक्ते सत्यजीत गायकवाड यांनी म्हटले आहे.इन्कम टॅक्सची नजरआयपीएलच्या वादाकडे आता केंद्रीय अर्थमंत्रालयाचेही लक्ष गेले आहे. इन्कम टॅक्स विभाग आता आयपीएलच्या सर्वच टीम्सच्या टॅक्स रिटर्नची चौकशी करणार आहे. दरम्यान, कोची टीमवरून सुरू असलेल्या वादावर स्पष्टीकरण देण्यासाठी शशी थरूर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. धमक्यांचा आरोपकोची टीममधून बाहेर पडा अशा धमक्या गुजराती गुंतवणूकदारांना येत असल्याचा आरोप रॉन्देवू ग्रुपने केला आहे. काही दिवसांपूर्वीच दोन गुजराती गुंतवणूकदारांवर इन्कम टॅक्सने छापा टाकला. परिनी डेव्हलपर्सचे विपुल शाह यांचा त्यात समावेश आहे. परिनीचे कोची टीममध्ये 26 टक्के शेअर आहेत. तसेच गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि ललित मोदी यांचे हितसंबंध असल्याचा थेट आरोप रॉन्देवूने केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 15, 2010 09:09 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 15, 2010 09:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close