S M L

नंदेडमध्ये चाकूचा धाक दाखवून पतीसमोरच विवाहितेवर अत्याचार

Samruddha Bhambure | Updated On: Sep 1, 2016 03:03 PM IST

rape_634565

01 सप्टेंबर : नांदेडमधील विवाहितेवर चाकूचा धाक दाखवत तिघा नराधमांनी तिच्या पतीसमोरच सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तिघा आरोपींना पोलिसांनी गजाआड केले आहे.

लातूरमधील विवाहिता आपल्या पतीसह माहेरी जाण्यासाठी निघाली होती. त्यानंतर ते दोघे नांदेडमधील मरखेल इथे पोहोचले. रात्री उशिर झाल्याने त्यांना घरी जाण्यासाठी कोणतेही वाहन उपलब्ध झाले नसल्याने त्यांनी रिक्षा ठरवली. या रिक्षा चालकाने त्याच्या दोन मित्रांना बोलावून घेतले. या तिघा नराधमांनी त्या महिलेच्या पतीला चाकूचा धाक दाखवत त्या महिलेवर बलात्कार केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 1, 2016 02:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close