S M L

लढवय्या कामगार नेता हरपला, शरद राव यांचं निधन

Sachin Salve | Updated On: Sep 1, 2016 08:52 PM IST

 लढवय्या कामगार नेता हरपला, शरद राव यांचं निधन

01 सप्टेंबर : ज्येष्ठ कामगार नेते आणि टॅक्सी आणि ऑटो युनियनचे अध्यक्ष शरद राव यांचं निधन झालं. राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दोन दिवसांपूर्वी त्यांना नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

फेरीवाल्यांना न्याय मिळवून देण्यापासून रिक्षा, टॅक्सी, गुमास्ता, किरकोळ व्यापारी महापालिका, बेस्ट, कारखाने आणि आताच्या मॉलमधील असंघटित कामगारांना कंत्राटी कामगारांच्या न्याय हक्कासाठी शरद राव यांनी लढा दिला होता. शरद राव यांना जठराचा कॅन्सरने ग्रासले होते. गेल्या काही दिवसांमध्ये प्रकृतीही ढासळली होती.  दोनच दिवसांपूर्वी त्यांना नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्यांची प्राणज्योत मालवली.

शरद राव यांच्या कन्या कॅनडाला असतात. त्या परवा सकाळी मुंबईला येतील. तोपर्यंत शरद राव यांचं पार्थिव शितगृहात ठेवण्यात येईल.त्यानंतर 3 सप्टेंबर रोजी सकाळी 7 ते 10 या वेळेत शरद राव यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. आणि त्यांच्या राहत्या घरातून त्यांची अंत्ययात्रा निघेल आणि 3 सप्टेंबर रोजी दुपारी ओशिवरा स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

शरद राव यांची कारकीर्द

- बॉम्बे लेबर युनियनमध्ये प्रवेश

- 70 च्या दशकापासून कामगार चळवळीत सक्रिय

- जॉर्ज फर्नांडिस यांच्या खांद्याला खांदा लावून काम

- वारंवार बंदची हाक दिल्यानं बंद सम्राट अशी ओळख

- रिक्षा, टॅक्सी, बेस्ट आणि कारखान्यांत युनियन

- विधानसभा निवडणुकीत शरद रावांचा पराभव

- गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेससोबत काम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 1, 2016 06:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close