S M L

एक जीबी फक्त 50 रुपयांत, काय आहेत रिलायन्स जिओची वैशिष्ट्ये?

Samruddha Bhambure | Updated On: Sep 1, 2016 03:22 PM IST

एक जीबी फक्त 50 रुपयांत, काय आहेत रिलायन्स जिओची वैशिष्ट्ये?

CrP2tGiVYAEnEXx

01 सप्टेंबर: रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी आज बहुचर्चित जिओ टेलिकॉमच्या 4G सेवेची घोषणा केली आहे.रिलायन्स उद्योग समूहाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा आज मुंबईत पार पडली. रिलायन्सची 'जियो' ही एक महत्त्वाकांक्षी टेलिकॉम सर्व्हिस आहे आणि याद्वारे ग्राहकांना सुपरफास्ट इंटरनेट सेवेचा लाभ आता घेता येणार आहे. एक नजर टाकूया रिलायन्स जियोच्या वैशिष्ट्यांवर...

 • जिओवरून कुठल्याही नेटवर्कला देशात फोन कॉल्स कायमचे फुकट
 • देशभरात रोमिंग फ्री, सगळ्यात स्वस्त व्हिडिओ कॉलिंग
 • जिओच्या फक्त डेटासाठी आता पैसे मोजा
 • जिओची इंटरनेट सेवा सर्वात वेगवान आणि सर्वात स्वस्त असेल
 • 1 एमबीसाठी पाच पैशांचा रेट तर 1 जीबीसाठी फक्त 50 रुपये
 • 5 सप्टेंबरपासून जिओचं सिमकार्ड तुमच्या हातात असेल
 • पहिल्या 90 दिवसात जिओवर सगळ्या सेवा फ्री असतील
 • सणासुदीच्या दिवसात एसएमएस फ्री असतील, डेटाही फार लागणार नाही
 • 2017 सालापर्यंत देशातले 90 टक्के फोन वापरणारे जिओ वापरतील
 • फोन कॉल्ससाठी पैसे मोजण्याचे दिवस संपले-मुकेश अंबानी
 • 29 राज्यांतली 18 हजार शहरं, दीड लाख गावांमध्ये 4G सेवा
 • 6 हजार चित्रपट आणि 300 लाईव्ह चॅनल्स बघता येणार
 • अडीच लाख गाणी जिओवर फ्री ऐकायला मिळणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 1, 2016 03:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close