S M L

नागपूर, विदर्भ हे विद्येचं माहेरघर व्हावं, गडकरींचं गणरायाकडे साकडं

Samruddha Bhambure | Updated On: Sep 5, 2016 04:15 PM IST

नागपूर, विदर्भ हे विद्येचं माहेरघर व्हावं, गडकरींचं गणरायाकडे साकडं

05 सप्टेंबर :  नागपुरात गणेशोत्सवाचा उत्साह असताना केंद्रीय दळवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या घरीही दरवर्षीप्रमाणे यंदाही बाप्पा विराजमान झाला आहे. विधीवत पूजा करुन गडकरी वाड्यावर बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी नागपूर- विदर्भाच्या यशाचे आणि भरभराटीची गणपती चरणी प्रार्थना केली.

गणेश बुद्धीचा दैवत आहे, आणि समृद्धी आणि संपन्नता आणणारा आहे. आजच्या दिवशी मी गणेशजींच्या चरणी वंदन करतो, आणि यानंतर येणारा भविष्यकाळ हा आपल्या देशवासीयांसाठी भय-दहशतवाद आणि भ्रष्टाचारमुक्त असावा,अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. त्याबरोबर नागपूर, विदर्भ हे विद्येचं माहेरघर व्हावं, असं साकडं ही त्यांनी बाप्पांकडे घातलं.

तसंच, नागपूरमध्ये रामदेव बाबांच्या मोठ्या प्रकल्पाचा भूमीपूजन होणार आहे. या प्रकल्पातून येणाऱ्या काळात अमच्या इकडच्या हजारो लाखो युवकांना रोजगार मिळावं हीच गणेशा चरणी प्रार्थना करतो, असंही ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 5, 2016 04:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close