S M L

आयपीएलची आयकर चौकशी

15 एप्रिलआयपीएलची कोटीच्या कोटी उड्डाणांची आता तपासणी होणार आहे. कारण आयकर विभागाची आता या टीम खरेदीच्या कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीवर नजर गेली आहे. आणि याला निमित्त ठरले आहे, ते कोची टीमवरून सुरू झालेल्या वादाचे. आयपीएलच्या सगळ्याच टीमच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याचे आयकर विभागाने ठरवले आहे. या कारवाईचाच एक भाग म्हणून आयकर खात्याच्या काही अधिकार्‍यांनी आज मुंबईतील बीसीसीआय इमारतीतील आयपीएलच्या ऑफिसला भेट दिली. प्रत्येक टीमने टॅक्स रिटर्न नियमीतपणे भरला आहे की नाही, याचीही चौकशी आता होणार आहे. चौकशीला सहकार्य करूदरम्यान आयकर अधिकार्‍यांच्या या चौकशीला आम्ही सहकार्य करू, असे आयपीएलचे कमिशनर ललित मोदी यांनी म्हटले आहे. आयपीएलच्या टीमबद्दलची संपूर्ण माहिती आम्ही आयकर अधिकार्‍यांना देऊ, असेही ते म्हणाले.तसेच ही फक्त चौकशी होती, छापा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तर कोची टीमच्या टेंडरसंदर्भातील महत्वाची कागदपत्रे गोळा करण्यासाठी आयकर अधिकारी आले असावेत, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. मोदींची चौकशीआयपीएलचे कमिशनर ललित मोदी आता चांगलेच अडचणीत सापडलेत. मुंबईतील त्यांच्या घरी इन्कम टॅक्सच्या अधिकार्‍यांनी त्यांची चौकशी केली. आम्ही आयपीएल लिलाव प्रकियेची चौकशी करत आहोत, काही दिवसातच याबाबत स्पष्ट माहिती देऊ, असे मुंबई इन्कम टॅक्सचे महासंचालक बी. पी. गौर यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे बीसीसीआय ललित मोदींचे पंख कापण्याच्या तयारीत आहे. आता बीसीसीआयचे अध्यक्ष शंशाक मनोहर आयपीएलचे को-चेअरमन होतील, अशी चर्चा आहे. एक आठवड्याच्या आत यावर निर्णय होऊ शकतो, अशी माहिती 'आयबीएन-लोकमत'ला मिळाली आहे. दरम्यान, शरद पवार यांनी आयपीएलची चौकशी करत असलेल्या अधिकार्‍यांना बीसीसीआयकडून संपूर्ण सहकार्य मिळेल, असे स्पष्ट केले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 15, 2010 02:31 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 15, 2010 02:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close