S M L

लोक काय म्हणतील याचा विचार करु नका, अमिताभ बच्चन यांचं नातींना पत्रं

Samruddha Bhambure | Updated On: Sep 6, 2016 09:58 PM IST

लोक काय म्हणतील याचा विचार करु नका, अमिताभ बच्चन यांचं नातींना पत्रं

Crlva3HVYAEh1uZ

06 सप्टेंबर :  बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या नाती नव्या आणि आराध्यासाठी एक खास पत्र लिहिलं आहे. या पत्रा द्वारे त्यांनी दोघींना आयुष्याचा बहुमोलाचा सल्ला दिला आहे. या पत्रातून त्यांनी नव्या आणि आराध्याला स्त्री असल्यामुळे लोक आपले विचार लादण्याचा प्रयत्न करतील पण तुम्हाला वाटेल तेच तुम्ही करा असा प्रेमळ सल्लाही दिला आहे.

आजोबांचं नातीस पत्र

माझ्या प्रिय नाव्या आणि आराध्या...,

तुम्ही दोघीही खुप छोट्या खांद्यावर खुप मोठ्या वारशाची धुरा वहाताय.

आराध्या , तुला वारसाय तो तुझे पणजोबा डॉ. हरिवंशराय बच्चन यांचा तर नाव्या तुझ्यावर जबाबदारी आहे ती  श्री. एच पी नंदा यांच्या वारशाची.

त्यांनी स्वकर्तृत्वानं  आडनावांना प्रसिद्धी ,आदर आणि ओळख मिळवून दिली. तुम्ही दोघीही बच्चन किंवा नंदा नक्कीच असाल पण तुम्ही मुलीही आहात आणि महिलाही !

तुम्ही महिला आहात म्हणून लोक तुमच्यावर त्यांचे विचार थोपतील, मर्यादा

घालतील.

ते तुम्हाला सांगतील तुम्ही कोणते कपडे घालावेत , कसं वागावं , तुम्ही कोणाला भेटावं आणि तुम्ही कुठे जावं

लोकांच्या मतांच्या छायेत जगू नका. तुमच्या ज्ञानाच्या प्रकाशानेच तुम्ही निवड करा.

तुमच्या स्कर्टच्या लांबीवरून तुमचं चारित्र्य कुणाला ठरवू देऊ नका.

तुम्ही कुणाशी मैत्री करावी , तुम्ही कोणाचं मित्र व्हावं हे सांगणाऱ्या व्यक्तींवर विसंबू नका.

लग्न त्याचवेळेस करा ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की करायचंय.

लोक बोलतील.भयानक गोष्टीही बोलतील.

पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रत्येकाचं म्हणणं ऐकाल. लोक काय म्हणतील याचा कधीच विचार करु नका

दिवसाच्या शेवटी , तुम्ही केलेल्या कृतीचा परिणाम भोगणाऱ्या तुम्हीच असाल . आणि म्हणूनच दुसऱ्या कुणाला तुमचे निर्णय घेऊ देऊ नका

नाव्या , जो विशेषाधिकार तुला तुझ्या नावाने , आडनावाने मिळाला आहे  तो तुला महिला म्हणून येणाऱ्या अडचणींपासून तुझं रक्षण करणार नाही.

आराध्या, जोवर तू हे पहाशील आणि समजशील मी तुमच्या आजूबाजुला नसेन कदाचित !पण मला असं वाटतं  आज जे मी तुम्हाला सांगतोय ते तेव्हाही सुसंगत असेल.

हे कठीण आहे . महिला होणं कठीणच आहे ! पण मला असं वाटतं तुमच्यासारख्या महिला  हे बदलतील.

 हे सोपं नाही. तुमच्या कक्षा स्वत: ठरवणं  , स्वत:ची  निवड स्वत: करणं ,

लोकांच्या अपेक्षा भेदून मोठं होणं . पण तुम्ही  हे करु शकाल .इतर महिलांसाठी आदर्श बनू शकाल...

हे तुम्ही करा. आणि  मी जे केलं त्यापेक्षा खूप काही तुम्ही साध्य करु शकाल . तेव्हा  मला अभिमान वाटेल... अमिताभ बच्चन म्हणून नाही तर तुमचा आजोबा म्हणून...

तुमचे लाडके

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 6, 2016 05:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close