S M L

कल्याणमध्ये पोलिसाला बुडवून मारण्याचा प्रयत्न

Sachin Salve | Updated On: Sep 7, 2016 01:37 PM IST

कल्याणमध्ये पोलिसाला बुडवून मारण्याचा प्रयत्न

कल्याण, 07 सप्टेंबर : विलास शिंदे यांचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच कल्याणमध्ये पोलिसाला बुडवून मारण्याचा प्रयत्न झालाय. तीसगाव नाका भागात हा धक्कादायक प्रकार आहे. या प्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

मंगळवारी दीड दिवसांचा गणपतीला निरोप देण्यात आला. कल्याणमध्ये विसर्जन करताना वेळकाढूपणा करणाऱ्या तरुणांना हटकल्याचा राग आल्यानं संतापलेल्या तरुणांनी पोलिसाला तलावात ढकलून देत चक्क पाण्यात बुडवण्याचा प्रयत्न केला.

पोलीस निरिक्षक नितीन डगळे यांना तलावात बुडवणाऱ्या चार जणांवर खूनाचा प्रयत्न करणे (307) प्रमाणे कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. आरोपींचा शोध सुरू हे चारही आरोपी जरीमरी माता मित्रमंडळाचे सदस्य आहेत.  हा सगळा प्रकार एका व्हिडिओ क्लिपमध्ये कैद झालाय. पण  इथेच हे संपत नाही.

हे मुजोर तरुण स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांचे समर्थक आहेत. त्यामुळे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय. पोलिसांवर त्यांना वाचवण्यासाठी आणि उलट पोलिसावरच छेडछाडीचा गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव टाकल्याचं बोललं जातंय. डीसीपी संजय शिंदे यांच्यावरही प्रचंड दबाव टाकला जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 7, 2016 09:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close