S M L

मुख्यमंत्र्यांचं काम उत्तमच,पण गृहखातं स्वतंत्र असावं-उद्धव ठाकरे

Sachin Salve | Updated On: Sep 7, 2016 03:24 PM IST

मुख्यमंत्र्यांचं काम उत्तमच,पण गृहखातं स्वतंत्र असावं-उद्धव ठाकरे

मुंबई, 07 सप्टेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगले असून त्यांचा कामाचा व्याप खूप जास्त आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांचा कारभार स्वतंत्र असावा असं म्हणत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पोलिसांवर होणाऱ्या हल्लाबद्दल चिंता व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांनी आज पोलीस कुटुंबियासह मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली.

पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांचा मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर पोलिस कुटुंबियांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. यावेळी पोलिसांच्या कुटुंबियांनी आपली व्यथा उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडली होती. हे प्रश्न सोडवण्यासाठी त्याचा योग्य पाठपुरावा करण्याचं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी त्यांना दिलं होतं. हेच आश्वासन पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी पोलीस कुटुंबियांसह सकाळी दहा वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.

गेल्या काही दिवसांत पोलिसांवर होणारे हल्ले वाढले आहे. जर पोलिसच सुरक्षित नसले तर आपण कुठल्या दिशेनं चाललो याचा विचार झाला पाहिजे.  पोलिसांना आपण हातात बेड्या घालून ड्युटीवर पाठवतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे अशी चिंता उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.  पोलिसांच्या केसाला धक्का लागता काम नये. पोलिसांवर जो कुणी हल्ला करेल त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे.  पोलिसांच्या कुटुंबियांना समाविष्ट करून एक समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीमध्ये पोलीस कुटुंबिय,सरकारचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी असणार आहेत. या समितीच्या माध्यमातून पोलिसांच्या समस्यांचा आढावा घेऊन पुढील मार्ग काढला जाईल अशी माहितीही उद्धव ठाकरे यांनी दिली. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगले आहेत पण त्यांचा व्याप खूप मोठा आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांचा कारभार स्वतंत्र असावा असं माझं स्पष्ट मत आहे अशी ठाम भूमिकाही मांडली.

कल्याणमध्ये  पोलीस अधिकाऱ्याला तलावात बुडवून मारण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी संबंधितांवर कोणत्याही दबावाला बळी न पडता लवकरात लवकर कडक कारवाई केली गेली पाहिजे अशी मागणीही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 7, 2016 01:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close