S M L

पुण्यात उद्यापासून स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन

अद्वैत मेहता, पुणे16 एप्रिलसाहित्य संमेलने, नाट्य संमेलने, अशी आपल्याकडे विविध प्रकारची संमेलने होतात. पण पुण्यात उद्यापासून एक अनोखे संमेलन होत आहे. आणि ते आहे, स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन. स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थांसाठी हे संमेलन म्हणजे पर्वणी ठरणार आहे. 17 आणि 18 एप्रिलला होणार्‍या या संमेलनाचे अध्यक्ष आहेत, ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रशासकीय अधिकारी विश्वास पाटील.पुण्याच्या न्यू- इंग्लिश स्कूलच्या मैदानावर हे संमेलन होणार आहे. संमेलनाला किमान एक लाख विद्यार्थी उपस्थित राहतील, असा आयोजकांचा अंदाज आहे. 'स्टडी सर्कल'तर्फे या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून 'आयबीएन-लोकमत' संमेलनाचा मीडिया पार्टनर आहे. संमेलनाची सुरुवात ग्रंथ दिंडीने होणार आहे. पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचे अनुभवकथन आणि संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्याशी संवाद साधण्याची संधी, हे संमेलनाचे आकर्षण ठरणार आहे.स्पर्धा परिक्षेसाठी लागणारी पुस्तकेही इथे खास सवलतीच्या किंमतीत मिळणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 16, 2010 11:12 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 16, 2010 11:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close