S M L

प्रीती राठी अॅसिड हल्ल्याचा दोषी अंकुश पनवारला फाशी

Samruddha Bhambure | Updated On: Sep 8, 2016 07:28 PM IST

प्रीती राठी अॅसिड हल्ल्याचा दोषी अंकुश पनवारला फाशी

मुंबई - 08 सप्टेंबर : मुंबईत 2013 मध्ये झालेल्या प्रीती राठी अॅसिड हल्ल्याप्रकरणी दोषी अंकुर पनवारला फाशीची शिक्षा सुनावली आहे. मुंबई सत्र न्यायालयानं अंकुरला मंगळवारी दोषी ठरवलं होतं. अंकुरला आज फाशी सुनावण्यात आली आहे. या निकालानंतर प्रीतीला न्याय मिळाल्याची भावना तिच्या कुटुंबियांकडून व्यक्त करण्यात येत होती.

प्रीती राठी ही मूळची दिल्ली असून, नौदलात नोकरी लागल्याने ती 2 मे 2013 रोजी मुंबईत आली होती. अंकुरचं प्रीतीवर एकतफच् प्रेम होतं. प्रीतीचा पाठलाग करत तो मुंबईत आला. वांद्र स्थानकावर उतराताच त्याने प्रीतीवर अॅसिड फेकलं. अॅसिड हल्ल्यात तिचा संपूर्ण चेहरा आणि डोळ्याला दुखापत झाली. अॅसिडचा काही अंश तोंडात गेल्याने अन्ननलिकेलाही इजा पोहोचली होती.

दरम्यान, हल्ल्यानंतर तिला ताबडतोब बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. तिला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले, पण उपचार सुरू असताना महिन्याभरातचं प्रीतीचा मृत्यू झाला.

प्रीतीची शैक्षणिक आणि करिअरमधील प्रगती आणि एकतर्फी प्रेमातून हा हल्ला केल्याचं सांगण्यातआलंय. पोलिसांनी मोठ्या कौशल्यानं तपास करीत अंकुरला अटक केली. तब्बल तीन वर्षानंतर आज कोर्टाने अंकुशला दोषी ठरवत त्याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. मुख्य म्हणजे पहिल्यांदाच अॅसिड हल्ल्याच्या खटल्यात दोषीला फाशीची शिक्षा झाली आहे.

प्रीती राठी अॅसिड हल्ला प्रकरण

  • प्रीती राठी आणि दोषी अंकुर पनवार दोघंही दिल्लीचे रहिवासी
  • अंकुरचं प्रीतीवर एकतर्फी प्रेम होतं
  • एप्रिल 2013 : संरक्षण मंत्रालयात नोकरीसाठी प्रीतीची निवड
  • 2 मे 2013 : प्रीती, तिचे वडील, काका आणि काकू वांद्रे टर्मिनसवर उतरले
  • काही क्षणांतच अंकुरनं प्रीतीवर अॅसिड फेकलं
  • डोळे, अन्ननलिका आणि किडनीला गंभीर इजा
  • बॉम्बे हॉस्पिटल या प्रतिष्ठित रुग्णालयात उपचार
  • 1 जून 2013 : प्रीतीचा मृत्यू
  • 17 जून 2013 : अंकुर पनवारला अटक
  • 6 सप्टेंबर 2016 : अंकुरला कोर्टानं दोषी ठरवलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 8, 2016 04:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close