S M L

कॉ. पानसरे हत्येप्रकरणी प्रत्यक्षदर्शीनं तिसऱ्या आरोपीला ओळखलं

Samruddha Bhambure | Updated On: Sep 8, 2016 08:55 PM IST

pansare new

08 सप्टेंबर : डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणात समावेश असलेल्या विनय पवार या सनातनच्या साधकाचा कॉम्रेड पानसरे यांच्या हत्येतही सहभाग असल्याचा दावा करण्यात आला आहे. एका प्रत्यक्षदर्शीने विनय पवारला ओळखलं आहे. कॉम्रेड पानसरे यांच्यावरील हल्ल्यासाठी विनय पवारने कोल्हापूरातील सागरमाळ परिसरात टेहळणी केली होती, असा दावा प्रत्यक्षदर्शीकडून करण्यात आला आहे.

विनय पवार हा सातारा जिल्ह्यातील उंब्रजचा आहे. तो सनातनचा साधकही आहे. गेल्या काही दिवसांपासून तो फरार आहे. पानसरे हत्येतील संशयित समीर गायकवाड, डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्यानंतर तिसरा संशयित सनातनचा साधक आणि वीरेंद्र तावडेचा साथीदार विनय पवार याला पोलिसांनी आरोपी केलं आहे

दरम्यान, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या चौकशीसाठी वीरेंद्र तावडेच्या पोलीस कोठडीत 16 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्याची 5 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यामुळे आज (गुरूवारी) त्याला पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी तावडेच्या पोलीस कोठडीत आठ दिवसांची वाढ करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 8, 2016 08:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close