S M L

शरद पवार-नारायण राणेंच्या भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण

Sachin Salve | Updated On: Sep 9, 2016 08:52 AM IST

शरद पवार-नारायण राणेंच्या भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण

09 सप्टेंबर : मुंबईमध्ये राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस नेते नारायण राणे यांची भेट झाली. नारायण राणेंच्या जुहूमधल्या निवसस्थानी गणपतीनिमित्त शरद पवार यांनी भेट दिली. आणि त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलंय.

शरद पवार फारसे अशा कार्यक्रमांना जात नाहीत. त्यात ते नारायण राणेंच्या घरी गेल्यानं चर्चेला उधाण आलंय. सध्या मराठा आरक्षण आणि अॅट्रोसिटीवरून राज्यभरात मोर्चे सुरू आहेत. ही सगळी पार्श्वभूमी असताना पवार आणि राणेंच्या भेटीला महत्व प्राप्त झालंय.

दरम्यान, शरद पवार आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीय यांची भेट घेणार आहेत. दक्षिण मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहावर दुपारी 3 वाजता ही बैठक होईल. राज्यातल्या साखर कारखान्यांबाबत दोघं चर्चा करतील. पण याव्यतिरिक्त अनेक मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. अॅट्रॉसिटी कायदा, पोलिसांवरचे वाढते हल्ले आणि इतर काही मुद्द्यांवरही दोघांमध्ये चर्चा होईल अशी शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 9, 2016 08:52 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close