S M L

मुंबई पालिकेनं 5 लाखांची लाच मागितली, हेच का अच्छे दिन?, कपिल शर्मांचा मोदींना सवाल

Sachin Salve | Updated On: Sep 9, 2016 02:55 PM IST

मुंबई पालिकेनं 5 लाखांची लाच मागितली, हेच का अच्छे दिन?, कपिल शर्मांचा मोदींना सवाल

मुंबई, 09 सप्टेंबर : सर्वांना  पोट धरुन हसवणार कॉमेडियन अभिनेता कपिल शर्मा भ्रष्टाचारामुळे त्रस्त झालाय. मुंबईत ऑफिससाठी पाच लाखांची लाच द्यावी लागली असा गंभीर आरोप कपिल शर्माने मुंबई महापालिकेवर केला आहे. कपिलने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विटकरुन घडलेल्या प्रकाराची तक्रार केली आणि हेच का अच्छे दिन ? असा सवालही विचारला.

कपिल शर्माला मुंबईतील अंधेरीतील सात बंगला भागात ऑफिस उभारायचंय. या ऑफिससाठी कपिलला पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाच लाखांची लाच मागण्याचा आरोप केला. गेल्या पाच वर्षांपासून 15 कोेटी रूपयांचा टॅक्स भरतोय आणि तरीही मुंबईत ऑफिस घेण्यासाठी मुंबई महापालिकेच्या अधिका-याला पाच लाख रूपयांची लाच द्यावी लागतेय असा आरोप कपिल शर्मानं केलाय. विशेष म्हणजे या प्रकरामुळे त्रस्त झालेल्या कपिलने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे टिवट्‌रवरून तक्रार केलीये. एवढंच नाही तर हेच का अच्छे दिन ? असा सवालही कपिल शर्मानं केलाय.

आयबीएन लोकमतशी बोलताना कपिल शर्मानं आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराची हकीकत सांगितली. सात बंगला भागातील जागा विकण्यासाठी माझ्या माणसाला सांगितलं होतं. त्याने त्यासाठी तसे प्रयत्न सुरू केले. पण, या कामासाठी काही महापालिकेच्या अटीशर्ती पूर्ण करायच्या होत्या. त्यासाठी पालिकेच्या खान नावाच्या अधिकाऱ्याने पाच लाखांची लाच मागितली. आम्ही ते पैसे ही दिले. पण तरीही आमचं काम झालं नाही.

याआधी आम्ही पालिकेत जाऊन रितसर प्रयत्न केले पण तिथे सारखी टाळाटाळ केली गेली. सहा महिन्याहून जास्त वेळ लागेल. तुम्ही पैसे द्या काम लवकर होईल असं सांगण्यात आलं. त्यामुळे आम्हाला नाईलाजाने पैसे द्यावे लागले. पण एवढं होऊन सुद्धा काम मात्र झाले नाही. उलट आणखी पैशांची मागणी करण्यात आली.

जर असं असेल तर ह्या देशात कसं रहायचं आणि का रहायचं असा संतप्त सवाल कपिलने उपस्थित केला. जर माझ्यासारख्याची ही अवस्था होत असेल तर सामान्यांचं काय होत असेल असंही कपिल शर्मानं म्हटलंय. कपिलने यावेळी मनसे आणि शिवसेनेचा उल्लेख केला.

दरम्यान, महापालिकेच्या दक्षता विभागाचे प्रमुख अभियंता मनोहर पवार यांनी या प्रकारावर निवेदन दिलंय. महापालिकेने या घटनेची गंभीर दखल घेतली असून संबधितांवर कठोर कारवाई केली जाईल. ही कारवाई करणे शक्य व्हावे यासाठी कपिल शर्मा यांनी त्यांना लाच मागणाऱ्याचे नाव द्यावे, अशी त्यांना विनंती करण्यात येत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 9, 2016 09:34 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close