S M L

...आणि 'ति'ने जिंकलं, अॅसिड हल्लानंतर गाजवला रॅम्पवॉक

Sachin Salve | Updated On: Sep 10, 2016 01:48 PM IST

...आणि 'ति'ने जिंकलं, अॅसिड हल्लानंतर गाजवला रॅम्पवॉक

reshma_kureshi10 सप्टेंबर : ती आली तिने पाहिलं आणि जिंकलं...असंच ऍसिड हल्ला पीडित रेश्मा कुरेशीबद्दल म्हणावं लागेल. शुक्रवारी न्यूयॉर्क फॅशन विकमध्ये रेश्माने मोठ्या विश्वासने रॅम्पवॉक करुन सर्वांची मनं जिंकली.

न्यूयॉर्क फॅशन विकमध्ये अर्चना कोच्चर या फॅशन डिझायनरसाठी रेश्माने हा रॅम्पवॉक केला. एफटीएल मोडा या कंपनीनं रेश्माला निमंत्रण दिलं होतं. जगात ऍसिड हल्ला पीडितांकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलावा, आणि पूर्वग्रह सोडून द्यावे, यासाठी या कंपनीनं हा पुढाकार घेतला.

2014 साली रेश्मावर तिच्या बहिणीच्या नवर्‍यानं ऍसिड फेकलं. त्यात रेश्माला तिचा डोळा गमवावा लागला. पण तिनं हिंमत हारली नाही. धाडसानं उपचारांना सामोरी गेली. नंतर फॅशन जगतात पदार्पण केलं. आज सौंदर्य विषयक सल्ले देणारे तिचे अनेक व्हिडिओ यूट्यूबवर आहेत. आमच्याकडे दयेनं पाहू नका, असं काहीच नाही जे तुम्ही करू शकता आणि आम्ही करू शकत नाही, असं ही 19 वर्षांची मॉडेल सांगते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 10, 2016 01:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close