S M L

गणेश विसर्जनावेळी तराफा उलटला,आ.सुरेश हळवणकरांसह अधिकारी बचावले

Sachin Salve | Updated On: Sep 10, 2016 10:23 PM IST

गणेश विसर्जनावेळी तराफा उलटला,आ.सुरेश हळवणकरांसह अधिकारी बचावले

10 सप्टेंबर : इचलकरंजीत शहापूर गावात गणेश विसर्जनावेळी तराफाच उलटल्याने स्थानिक आमदार सुरेश हळवणकर यांच्यासह शासकीय अधिकारीही पाण्यात पडले. पण सुरक्षारक्षकांनी वेळीच सगळ्यांना पाण्याबाहेर काढल्याने सर्वांचे प्राण बचावले.

शहापूर गावातल्या खणीत म्हणजेच छोट्याशा तलावात दुपारच्यावेळी ही दुर्घटना घडलीय.आमदार सुरेश हळवणकर, त्यांची दोन मुले , अतिरिक्त पोलीस अधीक्षक दिनेश बारी, उपअधिक्षक विनायक नरळे, नगरपालिका मुख्याधिकारी डॉ.प्रकाश रसाळ हे सर्व पाण्यात पडले होते. मात्र सुदैवाने तराफावर असलेल्या अकराजणांना काठावरील व्हाईट आर्मीचे स्वयंसेवक, पोलीस आणि नागरिकांनी सुरक्षित बाहेर काढले. यापैकी मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांच्या पोटात पाणी गेल्याने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आलंय. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 10, 2016 05:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close