S M L

काँग्रेसचे नेते टिनपाट, नितीन गडकरींची मुत्तेमवारांवर टीका

Sachin Salve | Updated On: Sep 10, 2016 10:20 PM IST

काँग्रेसचे नेते टिनपाट, नितीन गडकरींची मुत्तेमवारांवर टीका

नागपूर, 10 सप्टेंबर : विदर्भातील काँग्रेस नेत्यांनी आपल्या मुलांनाच रोजगार देण्याचं काम केलंय अशा टिनपाट नेत्यांची नावे घेऊन त्यांना महत्त्व देणं गरजेच नसल्याची टीका केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसचे नेते विलास मुत्तेमवार यांचा उल्लेख न करता केली.

बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फुडपार्कचे भूमिपूजन नागपूरच्या मिहान प्रकल्पात आयोजित करण्यात आले होते. ते नागपुरात बोलत होते. या सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस आणि आपण कधीही आपल्या मुलांचा विचार न करता विदर्भातील तरुणांच्या रोजगाराचाच विचार केल्याचंही गडकरी म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी बाबा रामदेव यांना अनेक राज्यांनी मोफत जागा देऊन उद्योग सुरू करण्याची विनंती केल्याचं सांगितलं. पण रामदेव बाबा यांनी महाराष्ट्रात पैसे भरून मिहानमध्ये उद्योग उभारल्याबद्दल त्यांचे आभार मानत असल्याचं सांगितलं. यावेळी बोलतांना बाबा रामदेव यांनी पुढील वर्षापर्यंत पतंजलीचा कारभार पन्नास हजार कोटींपर्यंत जाणार असल्याचा विश्वास बोलून दाखवला.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते विलास मुत्तेमवार यांनी पतंजलीला देण्यात आलेल्या जागेवरून भाजपवर टीका केली होती आणि याप्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्याला आज नितीन गडकरी यांनी अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 10, 2016 10:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close