S M L

गुटख्याची पिचकारी विद्युत वाहिनीवर मारली, तरुणाच्या जीवावर बेतली

Sachin Salve | Updated On: Sep 12, 2016 07:14 PM IST

गुटख्याची पिचकारी विद्युत वाहिनीवर मारली, तरुणाच्या जीवावर बेतली

12 सप्टेंबर : गुटखा खाऊ नका, तो आरोग्यास घातक आहे अशा सुचना वारंवार दिल्या जातात. पण, गुटखा तर खाला पण त्याची पिचकारी विद्युत वाहिनीवर मारणे एका तरुणाच्या जीवावर बेतल्याची घटना मालेगावमध्ये घडलीये. मोहम्मद यासिन मोहम्मद सलीम असं या 21 वर्षी तरुणाचं नाव आहे.

मोहम्मद यासिन हा तरुण अब्दुल खालिक पार्कजवळ त्याचा भाऊ मोहम्मद अमिनला भेटायला गेला होता. मोहम्मद अमिन हा येथे गफर अब्दुल हनिफ हुसैन यांच्या कापड कारखान्यात कपड्यांवर रंगकाम करतो. दुमजली इमारतीच्या वरच्या मजल्यावर काम सुरू असताना मोहम्मद यासिनने तोंडातील गुटख्याची पिचकारी बाहेर मारली. मात्र, या इमारतीच्या जवळून गेलेल्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीवर ही पिचकारी पडल्याने मोहम्मद यासिन विद्युत दाबाच्या दिशेने खेचला गेला. यातच त्याचा जागीच मृत्यू झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 12, 2016 01:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close